श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

सतरा वर्षांच्या सत्तेवर गंभीर आरोप

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

गेल्या 17 वर्षांत श्रीवर्धनमध्ये विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाली; मात्र, प्रत्यक्षात हा विकास सर्वसामान्यांसाठी नव्हे तर ठराविक ठेकेदार आणि राजकीय गटांसाठीच झाला का, असा तीव्र सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.

प्रत्येक निवडणुकीपूर्वी श्रीवर्धनमधील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा योजना, समुद्रकिनारा सुशोभीकरण, पर्यटन प्रकल्प करणार असल्याच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या. परंतु, वास्तव चित्र वेगळेच दिसत आहे. जी कामे पूर्ण झाल्याची दाखवली ती कामे काही महिन्यांतच उखडली आहेत. पावसाळा आला की नव्याने बांधलेले रस्ते देखील खड्ड्यांनी भरतात, गटारे तुंबतात व फरसबंदी उखडते. त्यामुळे स्थानिकांचा आरोप आहे की, हा केवळ प्रशासनिक निष्काळजीपणा नसून, राजकीय संरक्षणाखालील ठेकाराज आहे. ठराविक ठेकेदारांना वारंवार कासमीकरणेमे देण्यात येतात, निविदा प्रक्रिया पारदर्शक नसते आणि गुणवत्तेची तपासणी केवळ कागदोपत्री होते, असा आरोप होत आहे. राजकीय आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांचे कथित हितसंबंध यामुळेच निकृष्ट कामांवर कारवाई होत नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. काम निकृष्ट असले तरी बिलं वेळेवर मंजूर होतात; मग जबाबदारी कोणाची? असा सवाल देखील स्थानिक नागरिक विचारत आहेत.

विरोधकांनी या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना थेट लक्ष्य करत, गेल्या 17 वर्षांत झालेल्या सर्व कामांची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी आणि थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची व निवडून आलेल्या प्रतिनिधींची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version