अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरोग्य सेवेसाठी सुरू
| आंबेत | वार्ताहर |
आंबेत परिसरात सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली आरोग्य इमारत ही गेली अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आली. या इमारतीचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटून गेले तरी या इमारतीचे उदघाटनाची प्रतिक्षेतच होती, हीच बाब लक्षात घेत जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटिल यांनी इमारतीची पाहणी करुन अनेक समस्या मार्गी लावल्या. इमारत पूर्ण होऊन देखील उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेली इमारत नागरिकांच्या सोयी सुविधानभावी ताटकळत उभी राहण्यापेक्षा त्याचा योग्य लाभ आणि आरोग्य सुविधा सुरू राहावी यासाठी हे आरोग्य केंद्र आपण सुरू करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे परिसरात गरजू गोर गरीब जनतेला याचा फायदा होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आंबेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अनेक नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत, खासगी दवाखान्यात नागरिकांची अक्षरशः लूट होत असून सामान्य नागरिकांना हा खर्च न परवडणारा आहे.
नाविद भाईजान, सामाजिक कार्यकर्ते