। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव-मोर्बा रस्त्यावर निळगुण गावच्या हद्दीत हॉटेल मूनपॅलेस समोर अंधारात धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर रिक्षा धडकली. या झालेल्या अपघातात रिक्षामधील एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले. जखमींमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे.
ट्रेलर चालक मोहम्मद सेहनशाह मेराज अहंमद याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर प्रवासादरम्यान रस्त्यात बंद पडलेली असताना इतर वाहनांना सूचना देण्याकरिता वाहनास रिप्लेक्टर अथवा सूचना दर्शक सिग्नल न लावता वाहन धोकादायक स्थितीत लावले होते. या ट्रेलरवर रात्रीच्या वेळी ही रिक्षा धडकली. या अपघातात रिक्षामधील एकाच कुटुंबातील मुस्तफा उस्मान शहा, अबिदा मुस्तफा शहा, रिहान मुस्तफा शहा, अरफाद मुस्तफा शहा, जुहेद मुस्तफा शहा हे पाचजण जखमी होऊन रिक्षाचा चुराडा झाला. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांना अधिक औषधोपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले.
ट्रेलरवर रिक्षा धडकून अपघात
