। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आंथ्रट नीड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली नव्हती. याबाबतची चर्चा सर्वत्र पसरली होती. त्यानंतर तालुका गटशिक्षण अधिकारी संतोष दोंड यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका रागिणी विशे यांच्याकडून लेखी खुलासा मागितला होता. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी न करण्याची कारणे स्पष्ट करीत अधिकार्यांना माफीनामा सादर केला असल्याची माहिती मिळाली आहे. 19 फेब्रुवारी हा दिवस रविवारी आला असल्याने आंथ्रट नीड शाळेच्या मुख्याध्यापीकेने शाळेत येण्याचे टाळले. त्याचवेळी अन्य शिक्षक हे रजेवर असल्याने तेदेखील शाळकडे फिरकले नाहीत. याबाबत मुख्याध्यापिकेने घडलेल्या प्रकारचा लेखी खुलासा शिक्षण विभागाला केला आहे.