| माणगाव | प्रतिनिधी |
देशात आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर असून, आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर दडपशाही केली जाते. आंदोलकांना नक्षलवादी अतिरेकी, दहशतवादी, ठरविले जाते. त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविले जाते. मागे मराठा समाजाने आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केले. शांततेने चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावून पोलिसांकरवी निष्पाप मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांवर निर्दयीपणे बे रात्री लाठीचार्ज करून अनेकांना जखमी केले. त्यावेळी राज्य सरकारने माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले. आणि आता केंद्रातील शिक्षण मंत्र्याच्या विरोधात समाजसेवक सोनम वांगचुक हे गेल्या 18 दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन करत आहेत, त्याची साधी दखलही सरकारला घ्यावीशी वाटली नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर भयंकर अमानुष, अमानवी माणूसकिला लाजवणारा लाठीमार करून अनेक विद्यार्थ्यांना जायबंदी करून अनेकांना मृत्यूच्या दाढेत लोटण्याचे अमानवी काम एका शिक्षण मंत्र्याला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने केले. आपला हा अहंकारीपणा दाखवून दिला असून, देश स्वातंत्र्याच्या नंतर एवढे निष्ठूर अहंकारी सरकार या देशाने कधीही पाहिले नसून, त्याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल. असे शिव, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रभाकर मसुरे यांनी नमूद केले आहे.
‘कधीही न पाहिलेलं अहंकारी सरकार’
