| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने स्वच्छ केटीएसपी, सुंदर केटीएसपी हे ब्रीद घेऊन आपल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन सर्व शाखांमधील शिक्षक, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागातून शाळा महाविद्यालयांच्या परिसरात भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक तास-एक साथ या उपक्रमांतर्गत एकाचवेळी मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी एक तास हा उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित केला होता.
या उपक्रमांतर्गत जनता पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, जनता माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, जनता विद्यालय लव्हेज शाखा, शिशु मंदिर खोपोली, सह्याद्री विद्यालय शिळफाटा, श्री शिवछत्रपती विद्यालय देवन्हावे, पाताळगंगा विद्यालय, होनाड, माध्यमिक विद्यालय सावरोली, के. एम. सी. महाविद्यालय खोपोली, बी.एल, पाटील तंत्रनिकेतन, खोपोली या मंडळाच्या सर्वच शाखांमध्ये श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
याप्रंसगी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबूबकर जळगावकर, किशोर पाटील, दत्तात्रेय मसुरकर, दिलीप पोरवाल, दिनेश गुरव, राजेश अभाणी, भास्कर लांडगे, चंद्रकांत केदारी, नरेंद्र शहा, विजय चुरी, जितेश ठक्कर, यशवंत साबळे, कैलास गायकवाड यांच्यासह सर्वच मान्यवर संचालक शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या समवेत श्रमदानाच्या या उपक्रमात सहभाग घेतला.







