| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आकुर्ले येथील शाळेमध्ये आनंद बाजार महोत्सवाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा पटेल यांनी मोठ्या दिमाखात केले होते. यावेळी बोलताना माजी केंद्र प्रमुख प्रतिभा साळोखे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन समजले पाहिजे. त्याची जाणीव झाले पाहिजे. या आनंद बाजार महोत्सवात विद्यार्थ्यांना दहा रुपये कमविण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली. हे त्यांना प्रत्यक्षात अनुभवाला मिळाले, असे प्रतिपादन साळोखे यांनी केले. या आनंद बाजार महोत्सवाप्रसंगी केंद्र प्रमुख अनंत खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ तसेच, पाले भाज्यांचे स्टॉल लावले होते. यामध्ये लिंबूपाणी, पाणीपुरी, गुलाबजाम, बोरे, कलिंगड, पावभाजी, वडापाव, मंचुरी, चटकदार भेळ, बिसलरी बाटल्या, बिस्कीटे, चॉकलेट, वांगी, टॉमेटो, भोपळा, शेवग्याच्या शेंगा, फ्लॉवर, कांदे, बटाटे आदी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन आनंद बाजार महोत्सवाचा आनंद घेतला.