तळाघर येथे गीतेंच्या प्रचाराचा शुभारंभ

| चणेरा | प्रतिनिधी |

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धाटाव विभागामध्ये इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रोहा तालुक्यातील तळाघर येथील महादेव मंदिरात महादेवाला साकडं घालून, पुष्प व नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. दरम्यान धाटाव विभागातील महादेव वाडी व मलखंड वाडी येथे गेले असता तेथील सामान्य जनतेच्या मनात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड प्रेम व आपुलकी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. यावेळी मशाल चिन्हासमोरील बटण दाबून अनंत गीतेंनाच निवडून देणार व आपला रायगड भ्रष्टचारमुक्त करणार, असा प्रतिसाद लोकांकडून मिळाला.

प्रचाराच्या वेळी शिवसेना धाटाव विभाग प्रमुख नितीन वारंगे, रोठ शाखा प्रमुख निलेश वारंगे, रोहा तालुका युवासेना अधिकारी राम महाडिक, रोठ उपशाखा प्रमुख महेश खांडेकर, युवासेना धाटाव उपविभाग अधिकारी नारायण चितळकर, कैलास माने, भारत वाकचौरे, दुर्गेश नाडकर्णी, अनिश शिंदे, धाटाव उपविभाग प्रमुख वालिवकर, महिला धाटाव विभाग प्रमुख अमृता साळुंके, महिला संघटीका रोहिणी गोसावी, महिला शाखा प्रमुख दक्षता वाघमारे, प्रेषित वलिवकर, मिलिंद मिलघरे, दीपक भगत, देवेंद्र वाघमारे, प्रमोद तांबडे व शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version