255 अंगणवाडी सेविका, 556 मदतनीसांच्या भरतीला मान्यता
| रायगड | खास प्रतिनिधी |
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे 10 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 255 तर मदतनीसची 556 पदे भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने या भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. पदांसाठी पात्र उमेदवारांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करत येणार असून, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग प्रकल्पाअंतर्गत 29 सेविका व 32 मदतनीस, कर्जत 1 प्रकल्पाअंतर्गत 18 सेविका व 33 मदतनीस, कर्जत 2अंतर्गत 13 सेविका व 40 मदतनीस, खालापूर 17 सेविका व 40 मदतनीस, महाड 23 सेविका व 82 मदतनीस, माणगाव 7 सेविका 57, मदतनीस, तळा 6 सेविका, 17 मदतनीस, म्हसळा 6 सेविका व 9 मदतनीस, मुरुड 3 सेविका, 4 मदतनीस, पनवेल 32 सेविका व 61 मदतनीस, पेण 37 सेविका व 53 मदतनीस, रोहा 21 सेविका व 52 मदतनीस, पोलादपूर 6 सेविका व 19 मदतनीस, श्रीवर्धन 5 सेविका व 15 मदतनीस, सुधागड 22 सेविका व 27 मदतनीस आणि उरण 10 सेविका व 15 मदतनीस, अशी भरती होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती 20 मार्चपूर्वी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
अंगणवाडी सेविका पात्रता
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 फेब्रुवारी 2025
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष (विधवा महिलांसाठी कमाल 40 वर्ष)
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण
रहिवासी अट : उमेदवार स्थानिक महसुली गावचा रहिवासी असणे आव्यश्यक