वरसोलीच्या अनिकेत शिर्के यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग, वरसोली येथील अनिकेत रमेश शिर्के यांना राज्य शासनाच्यावतीने उत्कृष्ट उपजीविका तज्ञ हा कांदळवन प्रतिष्ठानचा पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. शिर्के हे पालघर जिल्हा कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान (वनविभाग) येथे उपजिविका तज्ञ या पदावर कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनाच्या निमित्ताने कांदळवन प्रतिष्ठान व कांदळवन कक्ष, मुंबई पुरस्काराचा सोहळा सह्याद्री अतिथीगृहात पर पडला. या सोहळ्यात गेल्या दहा वर्षात राज्यातील कांदळवन आणि सागरी परिसंस्था संवर्धनात सक्रिय सहभाग घेतलेल्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. अनिकेत रमेश शिर्के यांना त्यांचे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पिंजर्‍यातील जिताडा पालन, खेकडे पालन व निसर्ग पर्यटन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Exit mobile version