फणसाडमधील प्राण्यांची होणार गणना

गुरुवारपासून उपक्रमास शुभारंभ

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील सुपेगावजवळील फणसाड अभयरण्यात येत्या गुरुवारी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून प्राण्यांची गणना सुरुवात करण्यात येणार आहे.

सुमारे 54 कि.मी. क्षेत्र परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला आहे. नवाब सरकाराने हे अरण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासुन संरक्षित केलेले आहे. या अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरु, पिसोरी, ससा, काळेमांजर, रानमांजर ,जवादा, सालिंदर, मुंगा, वानर, मोर, गिधाड आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. या अभयरण्यात 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 27 प्रकारचे साप, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 90 प्रकारची फुलपाखरे (ब्ल्यू मॉरमॉन, मॅप) आदी फुलपाखरे दिसून येतात. याबरोबर नाग, फुरुस, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, अजगर यासारखे बिनविषारी साप येथे आढळतात. या सर्व प्राण्यांची गणना केली जाते. यंदा प्राण्यांमध्ये वाढ होणार की तेवढीच संख्या राहणार ते लवकरच कळणार आहे.

Exit mobile version