| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील सुमारे 54 कि.मी.क्षेत्र परिसरात फणसाड अभयारण्य क्षेत्राचा विस्तार झालेला असून, या अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी-नितिन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 मे या दिवशी बौध्द पौर्णिमेचे औचित्य साधून पक्षी -प्राण्यांची गणना करण्यात आली.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी-नितिन ढगे, वनपाल- आदेश पोकळ,किरण मोरे ,अरुण पाटील, संतोष पिंगळा, सुनील जाधव, केरबा खांडेकर, प्रदिप शेळके, गोरक्ष भांबरे, शशिकांत आरोटे, अभिजित पाटील, सुर्यकांत कुरभिले, पक्षी प्रेमी संदिप घरत, वनमजूर- सदानंद नाईक, प्रदिप बागवे, योगेश ढोकरे, केतन वने, किशोर धनवडे, दिपक पतेने तसेच मुंबई पुणा व अलिबाग येथील आलेले पर्यटक- अमित टिळेकर, निनाद अरुंडेकर, गीता परदेशी, अविनाश आगाशे, आरीन देव, रशिका बडवे, संजय सपकाळ, अजय सपकाळ, शुभम सपकाळ आदी उपस्थित होते.
या अभयारण्यात 19 प्रकारचे वन्यप्राणी आढळतात यामध्ये बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, षेकरु, पिसोरी, ससा, कालामांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगा, वानर, मोर, रान कुत्रा, गवा, गिधाड, आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच 190 प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी,130 प्रकारची फुलपाखरे या मध्ये ब्लु मॉरमॉन, मॅप, व आदि फुलपाखरु आढळुन येतात.
या जणगणानेमध्ये प्राणी- सांबर, रानडुक्कर, रानमांजर इत्यादी., पक्षी- बगळे, घुबड, वटवाघूळ, मोर, रान कोंबडा, रानरातवा, पाणकावळा, तिबोटी खंड्या, नवरंग लहान निळा खंड्या, हरियाल, राखी कोतवाल, मलबार धनेश, शामा, बेडुक तोंड्या, , रानपिंगळा, सातभाई, दयाल, स्वर्गीय नर्तक निळा माशीमार हळद्या सुतार पक्षी इत्यादी., सरपटणारे प्राणी – हिरवा चापडा,धिवड इत्यादी., रानरातवा पक्षाची तीन ठिकाणी अंडी, उभयचर -बेडुक यांची नोंद फणसाड अभयारण्यातील वनविभागाचे कर्मचारी पक्षी प्रेमी व पर्यटकांनी केली.
यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी – नितिन ढगे यांनी सांगितले की स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना निसर्गाचा अनुभव घेता यावा हाच मुख्य उद्दिष्ट पक्षी प्राण्यांची गणाना चा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही बौद्ध पौर्णिमेला पक्षी प्राण्यांची गणना मोजक्याच ठिकाणी वन्य प्राण्याला न त्रास देता जंगलातील 15 टक्के परिसरात लोकांमार्फत केलेली गणाना आहे. या गणाना करिता 13 ठिकाणी लाकडी मचान बांधण्यात आले होते. या मचान वरुन दुर्बीण व्दारे पक्षी प्राण्यांची गणना करण्यात आली यामध्ये सांबर, डुक्कराची छोटी पिल्ले पाणी पिण्यासाठी आलेली दिसुन आली.तसेच बिबट्या नी केलेली रान डुक्कराची शिकाराचे अंश दिसण्यात आले.तसेच वेगवेगळ्या पक्षीची नोंद करण्यात आली आहे.