गटातील संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडणे आवश्यक
। गुहागर । प्रतिनिधी ।
भूमी अभिलेख कार्यालयातून मोजणी नकाशे जोडल्याशिवाय मुद्रांक कार्यालयात जमीन व्यवाहार नोंदवले जाणार नाहीत, असा बदल नव्या कायद्यात झाल्यानंतर सर्वच जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाले आहेत. या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कामकाज सुरळीत होईल, असे मुद्रांक शुल्क विभागातील अधिकार्यांनी सांगितले. मात्र, जमिनींचे व्यवहार करणार्या दलालांवर उपासमारीची वेळ येणार हे मात्र निश्चित.
ज्या क्षेत्रातील जमिनीचा व्यवहार आहे, त्या क्षेत्रातील गटाची संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय नव्या कायद्याने जमीन व्यवहार करता येणार नाहीत. 1908 च्या कायद्यात काही बदल करण्यात आले असून सामाईक जागेबाचत तसेच गुंठेवारीसारख्या भागातील चतुःसीमांची कागदपत्रे घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्याने गेल्या. त्यामुळे चार दिवसांपासून मुद्रांक दस्त नोंदणीचेकाम ठप्प झाले आहे. राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार्यांनी जमीन खरेदी विक्री करण्यास मज्जाव करण्याचा शेरा असल्यास असे व्यवहार करू नये, अशा सूचना देण्यात आल्याने दस्तनोंदणी बांथली आहे. त्याचा खरेदी-विक्री व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. चार दिवसांपासून कामकाज ठप्पच आहे. काही ठिकाणी चतुः सीमांची कागदपत्रे दिल्यास व्यवहार होईल असे सांगण्यात येते. मात्र, एखाद्या गटातील पूर्ण मोजणीची कागदपत्रे नसतील तर व्यवहार होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
जमिनीचा व्यवहार करताना संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय जमीन व्यवहार करता येणार नाही असे नवा कायदा सांगत असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहार थांबले आहेत. या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कामकाज सुरळीत होईल, असे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहेत.
या कारणाने कामकाज ठप्प
1)जमीन खरेदी विक्री संबंधीच्या 1908 च्या कायद्यात बदल करण्यात आले आहेत. 2) ज्या क्षेत्रातील जमिनीचा व्यवहार आहे, त्या क्षेत्रातील गटाची संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय नव्या कायद्याने जमीन व्यवहार करता येणार नाही. 3) मोजणीची कागदपत्रे असल्याने व्यवहार होत नसल्याने मुद्रांक दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प झाले आहेत.
भूमि अभिलेखाची शोधा शोध
अनेक गावातील फेरफार भूमि अभिलेखमध्ये मिळत नसल्याने शेतकर्यांची इतर कार्यालयांमध्ये शोधा शोध सुरू आहे. तर काही गावातील नकाशेही गायब असल्याचे चित्र भूमी अभिलेख कार्यालयात दिसून येत आहे.