|नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमध्ये मंगळवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला आणि त्या पावसाने नेरळ गावातील सर्व रस्ते जलमय झाले. त्यात बाजारपेठ भागात रस्त्यांवर साचलेले पाणी हे अनेक दुकानांमध्ये गेल्याने व्यापार्यांचे नुकसान झाले.
कर्जत तालुक्यामध्ये काही दिवसापासून अवकाली पाऊस पडत आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये अवकाळी पाऊस अवघ्या काही तासासाठी पडत असतो परंतु, हे पाऊस पडत असताना नेरळ बाजारपेठेतील रस्ते तसेच पायीवाट असलेल्या रस्त्यांमध्ये पाणी तुंबलेले पाहायला मिळत आहे. रस्त्याला लागून असलेल्या गटारांमध्ये पाणी जाण्यासाठी ठेवलेले आउटलेट मधून पाणी जात नसून हे पाणी सर्व रस्त्यावर सासून राहत आहे. त्यामुळे वाहन चालकांना तसेच पायी चालणार्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायमस्वरूपी राहिली तर पावसाळ्यात पडणारा पाणी हा खूप मोठ्या प्रमाणात असतो काही मिनिटासाठी पडणार्या पावसामध्ये ही परिस्थिती आहे.तर पावसाळ्यात मुसलदार पडणार्या पावसामध्ये हीच परिस्थिती पाहिला मिळणार का.? असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे. हीच परिस्थिती अशीच राहिली तर नेरळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असतो त्यामुळे पाणी सर्व दुकानांमध्ये जाण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे यावर नेरळ ग्रामपंचायत तात्काळ उपायोजना करणार का..? व नागरिकांना होणारा त्रास दूर करणार का..? हे पाहणं आता एकच गरजेचे आहे.