। गुहागर । प्रतिनिधी ।
ऐन विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर गुहागर तालुक्यातील नरवण येथे धारदार चाकूच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. या हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी बदलापूर येथून फरार असलेल्या संदीप पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती. त्याचदरम्यान, विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर प्राणघात हल्ला केल्याने या निवडणुकीला गालबोट लागले होते. गुहागर तालुक्यातील नरवण येथील हॉटेल सावली येथे विकास जाधव हे दि.17 नोव्हेंबर रोजी पत्नी व आपल्या सहकार्यांसोबत बसले होते. त्यावेळी त्यांना फोन आल्याने ते उठून बाहेर गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी गाडीवर देखील दगड मारण्यात आले होते. दरम्यान, ही घटना लक्षात येताच पत्नी आणि सहकारी बाहेर येताच मारेकरी पसार झाले होते. जखमी जाधव यांच्यावर गुहागर ग्रामीणमध्ये तातडीने उपचार करण्यात आले होते. गुहागर पोलिसांना या गुन्ह्यातील दोघांना काही महिन्यांपूर्वी मुंबईतून ताब्यात घेतले होते. तर, फरार असलेल्या संदीप पवार याला बदलापूर येथून गुन्हे अन्षण शाखेकडून ताब्यात घेतले आहे.