माणगाव पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव शहरातील माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,उतेखोल ता.माणगाव या पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन गुरुवार (दि.1) संस्था कार्यालय चौधरी कॉम्प्लेक्स माणगाव याठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून वाण लुटण्याचा आनंद घेतला. या हळदी-कुंकू समारंभात हजारोंचा संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी संस्थेच्या भागधारक, खातेदार, हितचिंतक व मित्रपरिवाराचे संस्थेचे चेअरमन आनंद यादव व सहकाऱ्यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आनंद यादव, व्हाईस चेअरमन मदनलाल जैन, सर्व संचालक मंडळ, पुंडलिक गायकवाड, सर्व कर्मचारी वृंद व स्वल्पबचत प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version