| उरण | प्रतिनिधी |
एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या व सर्वांना सोबत घेउन प्रगती करणाऱ्या जेष्ठ नागरिक मंडळ उरणचा 29 वा वर्धापनदिन समारंभ रविवारी (दि.25) उरण तालुक्यातील रोटरी स्कुल, बोरी येथे साजरा करण्यात आला. जेष्ठ नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम तसेच वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे काम जेष्ठ नागरिक मंडळ करत असून या मंडळातर्फे वर्षभरात विविध वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबविले जातात. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हसमुख भिंडे, अरूण मोदी, उमेश नाईक आणि इतर सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी होते. यावेळी वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या आणि विवाहाची 50 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला.