| कोर्लई | वार्ताहर |
संत रोहिदास महाराज यांच्या 647 व्या जयंती निमित्ताने मुरुड तालुक्यातील साळाव रोहिदास नगर येथे श्रीसंत रोहिदास नवतरुण मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला. रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, नंदगावे, राहूल वाडेकर, डॉ.शिवाजी वाघ, सरपंच वैभव कांबळी, दिनेश बापलेकर, निलम पाटील, अंकिता कांबळी, समरीन कासकर, चंद्रशेखर मयेकर, सचिन मोरे, चंद्रकांत काटकर, शिक्षक वृंद, प्रमोद नागोठणेकर, गणेश नागोठणेकर, कृष्णा वाडेकर, विजय नागोठणेकर, संदीप नागोठणेकर, जगदीश वाडेकर, हरिश्चंद्र नागोठणेकर, आकाश नागोटकर, अनंत वाडेकर, निमेश वाडेकर, संतोष नागोठणेकर यांसह समाज बांधव, ग्रामस्थ व महिला यावेळी संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.