श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापनदिन

| बोलीपंचतन | वार्ताहार |

श्रीवर्धन तालुक्यातील गौळवाडी (निगडी )येथे यादव गवळी समाज स्थानिक ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ, श्री समर्थ महिला मंडळ यांच्या वतीने श्री कृष्ण मंदिराचा 20 वा वर्धापन दिन व महाराष्ट्र यादव ट्रस्ट श्रीवर्धन शाखेचे 24 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाज सेवकांचा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी संजय रिकामे, नागेश साबळे, गणेश दिवेकर, मोहन दिवेकर, संतोष मिरगळ, गणेश साबळे, रुपेश महाडिक, सुनील तांबडे, संजय महाडिक, मोहन लाड, दिगंबर तांबडे, विनोद महाडिक, मयूर धुमाळ, सचिन साबळे, नामदेव साबळे, सुयोग साबळे यांच्यासह असंख्य समाज बांधव नवतरुण मित्र मंडळ उपस्थित होते.

Exit mobile version