गोवेले विभागाचे वार्षिक अधिवेशन

। म्हसळा । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील माणगाव व म्हसळा तालुक्यातील यादव सहाय्यक समिती गोवेले विभागाचे वार्षिक अधिवेशन रविवारी (दि.14) फळसप येथे संपन्न झाले. या अधिवेशनात 16 गावातील सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मागील 70 वर्षांपासून विविध विषयांच्या आधारे समाजाची वाटचाल करीत आहे. यामध्ये अनेक अशा विषयांवर योग्य असे कार्य करून समाजात एकोपा करून आनंदात राहत आहेत. 70 वर्षांच्या कालखंडात आजपर्यंत समाजातील अनेक विषयांवर समाजाच्यावतीने न्यायनिवाडा करण्याचे काम आज पर्यंत चालु आहे आणि समाजाबद्दल लोकांच्या मनात एक आस्था आहे. परंतु, काही दिवसांपासून यादव सहाय्यक समिती गोवेले विभागाचा नाव बदनाम करण्याचे काम काही समाजातील तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. आज 70 वर्षाच्या काळात कधीही कोणत्या गावाला वाळीत टाकणे किंवा बहिष्कार टाकणे यांसारखे विषय कदापि घडले नसताना नाहक बदनामी करण्याचे प्रकार चालु आहेत. अशी बदनामी करणार्‍या व्यक्तींवर समाजाच्यावतीने कायदेशीर कारवाई करून अब्रू नुकसानीचा दावा करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.

Exit mobile version