| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा 2024-25 चे वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव नुकतेच पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलनात कला, क्रीडा नाट्य स्वरुपातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मंगेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, परीक्षक प्रा. जामदार, प्रा. भवरे, सांस्कृतिक प्रमुख डॉ. भगवान लोखंडे, डॉ. राजाराम थोरात, डॉ. दत्ता कुंटेवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ज्यामध्ये पोवाडा, कोळीगीत, नाटक, लावणी आदी कार्यक्रम सुंदर पद्धतीने सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी केले. उद्घाटनप्रसंगी सचिव मंगेश देशमुख यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख पालकांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निवेदन डॉ. तृप्ती थोरात व डॉ. भगवान लोखंडे यांनी, तर आभार डॉ. दत्ता कुंटेवाड व डॉ. राजाराम थोरात यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यपकेतर कर्मचारी, पालक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.