आरएसपीची वार्षिक सभा संपन्न

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दि.19) सप्टेंबर रोजी वडखळ येथील जयकिसान हायस्कूल येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे कोकण विभागीय समादेशक हिराजी पाटील होते तर प्रमुख अतिथी जिल्हा शिक्षणाधिकारी ज्योत्सना पवार-शिंदे होत्या. यावेळी आरएसपीचे उपमहासमादेशक अनिल कुंभार, विभागीय समादेशक अ‍ॅड.के.डी.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, रविंद्र वाघमारे, दिपक मोकल, आर.एम.पाटील, किशोर राठोड, येरुणकर, आर.डी.नाईक,दामाद ,बी.आर.पालवे,अडसरे तसेच जिल्ह्यातील साठ पथकांचे अधिकारी उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी सौ.पवर-शिंदे यांनी शाळांमधील आरएसपी विषय महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांना लहानपणापासून वाहतुकीच्या नियमांची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशा त्या म्हणाल्या. यावेळी अनिल कुंभार, अ‍ॅड.के.डी.पाटील, हिराजी पाटील यांनी भाषणे केली. प्रास्ताविक रविंद्र वाघमारे यांनी केले, येरुणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार पाटील यांनी केले. अतिरिक्त समादेशक किशोर राठोड यांनी कोरोना काळात विशेष कामगिरी बजावणार्‍या कोराना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविले.

Exit mobile version