| अलिबाग | प्रतिनिधी |
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चार चाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील त्यांनी (दि.24) कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जांमध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतिसह जमा करावा.
एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी (दि.24) सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन वेळेत नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एका पेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्यांची नोंद घेऊन (दि.25) दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रकमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा. अतिरिक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रुपयाचा असावा, त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षणचा विचार केला जाणार नाही. या अर्जासाठी त्याच दिवशी सायं. 4.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.
नवीन दुचाकी मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- मंगळवार (दि.25) एप्रिल दुचाकी वाहनांसाठी अर्ज स्विकारणे, बुधवार (दि.26) दुचाकी वाहनांसाठी आलेल्या अर्जांचा लिलाव.