डिफेन्स पेन्शन धारकांना आवाहन

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हयातील सर्व राजी सैनिक, विधवा, अवलंबीत जे डिफेन्स पेन्शनधारक आहेत आणि ज्यांची पेन्शन स्पर्श पोर्टलमध्ये स्थलांतर झालेली नाही अशा माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी कार्यालयीन दिवशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत भेट द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच पोलादपूर, महाड व माणगांव तालुक्यातील माजी सैनिक, विधवा, अवलंबीत यांनी आव्हान करण्यात येत आहे की, जे माजी सैनिक, विधवा, अवलंबीत डिफेन्स पेन्शनधारक आहेत ज्यांची पेन्शन स्पर्श पोर्टल मध्ये स्थलांतर झालेली नाही अशा माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग कार्यालयाचे प्रतिनिधी खाली दिलेल्या दिवशी तालुक्यांना भेटी देणार आहेत.

माणगांव तालुक्यात 02 डिसेंबर 2024 (सोमवार) दौर्‍याचे ठिकाण – माणगांव तहसिलदार कार्यालय व माजी सैनिक संघटना कार्यालय, माणगांव, तालुका पोलादपूर 03 डिसेंबर 2024 (मंगळवार) ते 05 डिसेंबर 2024 (गुरुवार) दौर्‍याचे ठिकाण – पोलादपूर कचेरी कार्यालय, तालुका – महाड- 06 डिसेंबर 2024 (शुक्रवार) ते 07 डिसेंबर 2024 (शनिवार) दौर्‍याचे ठिकाण- सैनिकी विश्रामगृह महाड नवेनगर

आवश्यक ती कागदपत्रे
मूळ ओळखपत्र व त्याची छायांकीत प्रत, मूळ पीपीओ व त्याची छायांकीत प्रत, डिस्चार्ज बुक व छायांकीत प्रत , आधारकार्ड व पॅनकार्ड छायांकीत प्रत, बँक पासबुक व छायांकीत प्रत, मोबाईल नंबर. तरी माजी सैनिक, विधवा, अवलंबीत डिफेन्स पेन्शन धारक आहेत ज्यांची पेन्शन स्पर्श पोर्टलमध्ये स्थलांतर झालेली नाहीत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ले.कर्नल वैजनाथ माने,(नि.) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग यांनी केले आहे.
Exit mobile version