पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

। तळा । वार्ताहर ।
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता तळा तालुक्यामध्ये भात व नाचणी या पिकासाठी राबविण्यात येत असून योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै 2022 असल्याचे आनंद कांबळे तालुका कृषी अधिकारी तळा यांनी कळविले आहे. चालू वर्षी बीड पॅटर्न प्रमाणे योजना राबवण्यास मान्यता मिळाली असून जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक शासनाने केली आहे. योजनेत सहभागी शेतकर्‍यांना हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विमा संरक्षण मिळणार आहे.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी आपला विमा अर्ज ुुु.िाषलू.र्सेीं.ळप या पोर्टलवर थेट विमा हप्ता भरू शकतो किंवा आपली संबंधित राष्ट्रीयकृत बँक किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी तो जमिनीचा 7/12 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पिक पेरा स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्र घेऊन सहभाग घेऊ शकतो. तळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी आपले गावचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version