मुरुड तालुक्यात पोटनिवडणुकीसाठी अर्ज

आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील वावडुंगी,सावली,एकदरा,राजपुरी,मजगाव, उसरोली,चोरढे, कोर्लेई या 8 ग्रामपंचायत मधील 21 रिक्त सदस्य पदांच्या सार्वत्रिक पोटनिवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या पोटनिवडणुकरिता वावंडुगी ग्रामपंचायत मधुन प्रभाग 1 मधुन सर्वसाधारण मधुन गोविंद भिंकु अदावडे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी-विजय म्हापुसकर यांच्या कडे सादर केला.
मजगांव ग्रामपंचायत प्रभाग 1 मधुन अनु:जमाती खुला या मधुन वर्षा योगेंद्र गोयजी ,अभिनव शांताराम कोळी, जनाबाई रमेश वाघमारे, प्रभाग 2मधुन अनु:जमाती महिला या मधुन वर्षा योगेंद्र गोयजी, जनाबाई रमेश वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी- दिनेश वारगे यांच्या कडे संपुर्त करण्यात आले.
उसरोली ग्रामपंचायत प्रभाग 5मधुन सर्वसाधारण स्त्री यामधुन राजश्री मनिष नांदगावकर ,सुनिता संतोष मांदाडकर , समृद्धी प्रशांत पाटील , अश्‍वनी नितेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी- केतन भगत यांच्या कडे देण्यात आले. एकदरा ग्रामपंचायत प्रभाग 3 मधुन सर्वसाधारण स्त्री राखीव मधुन दर्शना मधुकर मकु ,मंगल वामन झुझे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी- अरुणकुमार देवले यांच्या कडे संपुर्त करण्यात आले. कोर्लई ग्रामपंचायत प्रभाग 2 मधुन अनु:जमाती महिला या मधून जना कृष्णा वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद माळी यांच्याकडे सादर केला.

Exit mobile version