जिल्हा संसाधन या पदाकरिता अर्ज करा; कृषी विभागाचे आवाहन

। अलिबाग । वार्ताहर ।
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत.


या पदाकरीता शिक्षण-पदवीधर (कोणत्याही शाखेचा) वयाची अट नाही, सविस्तर प्रकल्प अहवाल (DRP) बनविण्याचा अनुभव, अर्ज सादरीकरण, बँक मंजूर पद्धती, प्रक्रिया व अन्नप्रक्रियेतील अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादींची माहिती असणार्‍यांना व स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदाकरिता दि.20 जूनपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या पदासाठी संस्था पात्र असणार नाहीत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड, अलिबाग उज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.

Exit mobile version