मानसी लोखंडे यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील मौजे तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विद्यमान उपसरपंच मानसी मंगेश लोखंडे यांची 31 मे रोजी शासकीय नियमानुसार नियुक्ती करण्यात आली व पदभार स्वीकारले.

सदर या ग्राम पंचायत येथील थेट सरपंच रुपाली रघुनाथ कोस्तेकर यांना ग्राम पंचायतमध्ये केलेल्या अपहार व गैर व्यवहार प्रकरणी येथील सदस्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केले गेले होते आणि त्या चौकशी आवहालात चौकशीत कोकण विभागीय आयुक्त यांच्या सुनावणीत रुपाली कोस्तेकर यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 ) कलम 39 (1)नुसार सरपंचपद व सदस्यपद रद्द करण्यात आल्याने त्या जागेवर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत अधिनियम कायदा अंतर्गत याठिकाणी विद्यमान उपसरपंच सौ मानसी लोखंडे यांनी तो प्रभारी सरपंचपद स्वीकारले आहे.

यावेळी ग्राम विकास अधिकारी सौ पिंपळकर, ग्राम पंचायत सदस्य रिया लोखंडे, सरोजनी मरवडे, रणिता मरवडे, दशरथ जाधव, सुभाष बामणे, वसंत मरवडे, धनाजी लोखंडे, रामभाऊ मरवडे, शेकापचे खांब विभागीय नेते मारुती खांडेकर, रामचंद्र बामणे, शंकर मरवडे, नामदेव मरवडे, राम मरवडे, गणेश महाडिक, मंगेश लोखंडे, रविंद्र लोखंडे, भाऊ लोखंडे, एकनाथ लोखंडे, नंदकुमार रामचंद्र मरवडे, पूजा लोखंडे, चंदना लोखंडे, जयवंती महाडिक, भारती शिंदे, आदी चिल्हे व तळवली ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.

Exit mobile version