। नागोठणे । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा कलावती कोकळे यांची वर्णी लागली आहे. विद्यमान सरपंच अर्चना भोसले यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने चुकीची ठरविल्याने त्या अपात्र झाल्या होत्या. त्यांच्या जागी सरपंचपदी विराजमान झालेल्या कलावती कोकळे यांनी शुक्रवारी (दि.7) झालेल्या मासिक सभेत आपल्या पदाचा पुन्हा एकदा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी मनोहर सुटे यांच्यासह उपसरपंच भगवान शीद, ग्रामसेवक गोविंद शीद, सदस्य किशोर नावले, विनोद निरगुडे, प्रकाश डोबले, कल्याणी मोहिते, सविता धामणसे, प्रज्वली भोईर, नकीबाई कोकळे, पल्लवी भोईर, सुवर्णा शिद आदींसह उपस्थित सर्वांनी कलावती कोकळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.