। पनवेल । वार्ताहर ।
गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याचे सेवन करीत असताना आढळून आल्याने संंबंधित व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. हबीबुल्ला मुबारक गाझी (25) हा गांजा हा अंमलीपदार्थ जवळ बाळगून त्याचे सिगारेटच्या तंबाखूमध्ये मिश्रण करून सेवन करीत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.