तरुणांना गिर्यारोहणाकडे आकर्षित करणार
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावणारे म्हणून शिवशंभो हायकर्स मागील काही वर्षे थांबले होते. मात्र, शिवशंभो हायकर्समध्ये सहभागी होण्यासाठी असंख्य तरुण इच्छुक आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यात शिवशंभो युवा हायकर्सची नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय संस्थापक असलेल्या सदस्यांनी घेतला आहे.
कर्जतमधील शिवशंभो युवा हायकर्स ही संस्था गिर्यारोहण, निसर्ग संवर्धन व सायकलींग क्षेत्रात 1986 पासून कार्यरत आहे. या युवा हायकर्सच्या माध्यमातून अनेक सह्याद्रीतील आणि हिमालयीन मोहीमा संस्थेच्या वतीने यशस्वी केल्या आहेत. त्याचवेळी 20 वर्षे बाल विकास शिबिराचे आयोजन करुन साधारण 1500 मुलांनी गिर्यारोहण प्रशिक्षण दिले आहे. अनेक सायकल व मोटार सायकल मोहीमा संस्थेने आयोजित केलेल्या आहेत. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनचे कार्य कर्जत परिसरात केलेले आहे. या संस्थेची बैठक जेष्ठ सदस्य प्रदीप नागे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी शिवशंभो युवा हायकर्सचे विजय कडू, प्रदीप पटवर्धन, लक्ष्मीकांत चंदन, सुधांशु वनगे, विकास चित्ते, महेंद्र कर्वे, शैलेश सातपुते, जयेश लाड, योगेश पाटील आदी उपस्थित होते.त्यावेळी युवा हायरर्स पुन्हा नव्या उमेदीने उभी राहावी यासाठी नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.
शिवशंभो युवा हायकर्सच्या नवीन कार्यकारिणी अध्यक्ष विकास चित्ते, उपाध्यक्ष ऋषिकेश दानवे, सचिव शैलेश सातपुते, खजिनदार तुषार दिवेकर, महेंद्र कर्वे तर कार्यकारिणी सदसय म्हणून विजय कडू, दिलीप कदम, प्रकाश पटवर्धन, प्रदिप नागे, सुधांशु वनगे, योगेश पाटील (बाविस्कर) यांचा समावेश करण्यात आहे.