| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना बढती देण्यात आली आहे. त्यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. थावरचंद गहलोत यांची कर्नाटक राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर ही जागा रिक्त होती. 19 जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी त्यांच्या खांद्यावर सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत असणार आहे.