माणगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

हरविलेले मोबाईल, दागिने दिले परत

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव पोलिसांनी दमदार कामगिरी करत हरविलेले मोबाईल परत मिळवून दिले आहेत. माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत मोबाईल मिसिंग दाखल होत्या. त्याचा तपास करून पोलीस विभागाकडून सदरचे मोबाईल संबंधितांना मिळवून देण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकरी नितीनकुमार पोंदकुले यांच्या आदेशाने माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोलीस तपास पथकाने पोलीस ठाण्यातील दाखल गहाळ मालमत्तेमधील 13 मोबाईलचा शोध घेऊन संबंधित फिर्यादींना पोलीस ठाण्यात बोलावून दि.28 रोजी उपविभागीय पोलीस अधिकरी नितीनकुमार पोंदकुले तसेच राजेंद्र पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी नितीनकुमार पोंदकुळे, राजेंद्र पाटील, सतीश आस्वर, कीर्तीकुमार गायकवाड, सूर्यकांत भोजकर, राम डोईफोडे, नाथा दहिफळे, रावसाहेब कोळेकर, पोंदे, रेश्मा वजरकर, प्रीती ओमले, मुंडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version