। श्रीगांव । वार्ताहर ।
सतत आलेल्या सुट्यांमुळे अलिबाग व मुरूडकडे पर्यटकांचा प्रचंड कल आहे. हजारोंच्या संख्येने वाहने वडखळबाजूने अलिबागकडे आली आहेत. दरम्यान, वाहतुकीची कोंडी टाळण्यासठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यासह वाहतुक पोलीस तसेच होमगार्ड यांनी देखील कंबर कसली आहे. त्यामुळे फारसी वाहतूक कोंडी झालेली दिसून येत नाही. पोयनाड, पेझारी येथे कोंडी झाल्यास देहेन श्रीगावमार्गे पेझारी असा पर्यायी मार्ग देखील पोयनाड पोलीस ठाणे तसेच वाहतूक विभाग यांनी केले आहे. यामुळे वाहतूक सुरळीत पणे चालू आहे.