प्रभसिमरनचे शास्त्रींकडून कौतुक

| मुंबई | वार्ताहार |

दिल्लीविरुद्ध पंजाबसाठी सलामीला आलेला प्रभसिमरन सिंगने या सामन्यात चौफेर फटकेबाजी केली आणि 65 चेंडूत 103 धावा करून आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. शतक ठोकल्यानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सिंग यांनी ट्वीटरच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, अवघड खेळपट्टीवर प्रभसिमरन सिंगने जबरदस्त खेळी केली. आयपीएल एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे युवा खेळाडूंचं कौशल्य समोर येत आहे. आयपीएल जिंदाबाद, अशा प्रकारची प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली.

Exit mobile version