| चिरनेर | वार्ताहर |
शब्द सम्राट, शब्दांचा जादूगर स्वर्गीय रत्नाकर गाताडी यांचा नववा स्मृतिदिन आवरे येथील राजिप प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सुयश क्लासेसतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी पॅडचे वाटप करण्यात आले. रत्नाकर गाताडी हे निवेदन क्षेत्रातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व होते. भविष्यात त्यांच्या सारखा निवेदक आजच्या विद्यार्थ्यांमधून घडायला हवा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक योद्धा या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यात आराधना गावंड (प्रथम), पूर्वी म्हात्रे (द्वितीय), आकांक्षा भगत (तृतीय), तर सार्थक गावंड व कर्तव्य गावंड यांना उत्तेजनार्थाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी 1989-90 च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सौजन्याने रत्नाकर गाताडी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी शिवकुमार म्हात्रे, उपशिक्षिका समता पाटील, उपशिक्षक संजीवन पाटील, नागेंद्र म्हात्रे, शोभा पाटील यांनी आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राजेश गावंड, सरपंच निराबाई पाटील, दिनेश्वर गाताडी, ज्ञानेश्वर गावंड, सुनील ठाकूर, विनोद ठाकूर, राजेश गावंड, सोमनाथ म्हात्रे, शंकर पाटील, रूपाली चव्हाण, संजीवनी म्हात्रे, अल्का गावंड, प्रतीक्षा गावंड, रत्ना गावंड, सुवर्णा म्हात्रे, स्नेहा म्हात्रे व सलोनी म्हात्रे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निवास गावंड यांनी, तर आभार निर्भय म्हात्रे यांनी व्यक्त केले.