थेट परीक्षा केंद्रावर जाण्याची व्यवस्था

अभि युवा ग्रुपची सामाजिक बांधिलकी

| खोपोली | प्रतिनिधी |

दहावीच्या परीक्षेसाठी श्रीशिव छत्रपती विद्यालय देवन्हावे शाळेतील 30 विद्यार्थ्यांना शाळेपासून परीक्षा केंद्रापर्यंत नऊ दिवस पेपरला जाण्या-येण्याची मोफत व्यवस्था अभि युवा ग्रुप देवन्हावे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे विद्यार्थी व पालकांसह शिक्षकांनी कौतुक केले.


सामाजिक कार्यकर्ते रमण तावडे व अभि युवा सदस्य ओमकार वाणी, सिद्धीक बारस्कर, अतिश पाटील, अ‍ॅड. जयेश तावडे, यश पाटील, संदीप नलावडे, राज पाटील यांनी मुलांना पेढे भरवून तोंड गोड केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री शिव छत्रपती विद्यालय देवन्हावेचे शिक्षक दिवटे, पगारे मॅडम यांनी अभि युवा ग्रुपच्या सर्व आभार मानत सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Exit mobile version