भारतीय बौद्ध महासंगांचे पोलिसांना निवेदन
| पनवेल । वार्ताहर ।
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्य निषेधार्थ विधान केल्या बद्दल पनवेल पालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्याबद्दल सध्या वंचित बहुजन आघाडी, तसेच बौद्ध संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. गायकवाड यांनी आंबेडकर यांच्या बाबत विधान केल्याबाबत आरोप करण्यात आलेला आहे. याबाबत सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप तसेच फेसबुकचा वादग्रस्त मजकूर व्हायरल झाला आहे. गायकवाड यांनी मात्र या व्रत्ताचे खंडन केले असून, व्हायरल झालेली क्लिप खोटी असल्याने या क्लिपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे तहसीलदार विजय तळेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
गायकवाड यांच्याकडूनसोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्य विधान केल्याचा रोष मनात ठेऊन बौद्ध व भीम सैनिक एकवटले असून याबाबत तात्काळ माफी मागून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे आंदोलक सांगत आहेत. याबाबतनवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच कळंबोली पोलीस ठाणे यांच्याकडे जगदीश गायकवाड यांच्या या वक्तव्याबाबत रीतसर तक्रार निवेदन देण्यात आलेलं आहे. यावेळी शेकडो भिमसैनिक एकवटले होते.