| पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली नांदगाव मार्गावर वावळोली गावाजवळ एक मोटारसायकल जळून खाक झाली. यावेळी सुदैवाने मोटारसायकल स्वार व चिमुकली बचावली आहे.
पाली पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बहिरमपाडा येथील चेतन चंद्रकांत शेळके व त्यांची मुलगी शुभ्रा हे सायंकाळी पालीतून बहिरमपाडा येथे त्यांच्या मोटरसायलने जात असताना वावळोली गावा जवळ आले असता मोटासायकल अचानक बंद पडली. तिला पुन्हा स्टार्टर ने चालू करत असताना मोटार सायकल ने अचानक पेट घेतला. यावेळी शेळके तात्काळ आपल्या मुलीला घेऊन मोटार सायकल पासून सुरक्षित अंतरावर आले. काही मिनिटातच मोटारसायकल जळून खाक झाली आहे. या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज फडतडे हे करीत आहेत.