| श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन आगारातील एसटी गाड्यांचे ह्या महिन्यात रस्त्यावर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून काही कालबाह्य गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी दिल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात गाड्यांचे ब्रेक नादुरुस्त होणे, मागील चाकांचे हब निघणे अशा कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थ्यांनी जीव मुठीत घेऊन एसटीने प्रवास करतात. प्रवासी वर्गाच्या समस्या लक्षात घेऊन धवल तवसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, युवासेना पदाधिकार्यांनी श्रीवर्धन आगारप्रमुख तेजस गायकवाड यांची भेट घेऊन नादुरुस्त गाड्या संदर्भात आणि गाड्यांचे वेळापत्रक नियमित करण्याबाबत निवेदन दिले. निवेदन देतेवेळी अविनाश कोळंबेकर, शिवराज चाफेकर, जुनैद दुस्ते, शादाब पटेल, अनंत गुरव, सिध्देश पोवार, श्रीकर किर, नवनाथ कांबळे, मनीष बोथरे उपस्थित होते.
रस्त्यावर गाड्या बंद पडण्याचे प्रमाण एक महिन्यात थांबले नाही तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्या कारणाने श्रीवर्धन आगाराच्या विरोधात श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील युवासेना संघटने मार्फत तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल.
धवल तवसाळकर
सर्व एस.टी.गाड्यांची देखभाल माझ्या देखरेखीखाली सुरू आहे. गाड्यांची काही अंतर्गत दुरुस्ती असेल तर त्या दुरुस्तीचा अंदाज अगोदर येत नाही. गाड्या रस्त्यावर नादुरुस्त होण्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
तेजस गायकवाड
श्रीवर्धन आगारप्रमुख