| चिरनेर | वार्ताहर |
गोदरेज हिंदुस्थान युनिलिव्हर आणि रॉकेट बेन्किसर या नामांकित कंपनीचे डेटॉल व्हीट हार्पिक, लायझॉल आणि कोलिन यासारखे हुबेहूब दिसणारे प्रॉडक्ट बनवून ते स्वस्तामध्ये दुकानदारांना विकणार्या दोघांना न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली आहे.
राजेशभाई, राघूभाई चामरिया आणि अरविंद लीरा पटेल राहणार कच्छ, गुजरात या दोघांना अटक केली आहे. तर लालजी नावाचा मुख्य आरोपी फरार आहे. त्यांच्याकडून 5 लाख 95 हजार 198 रुपयांचा बनावट माल हस्तगत केला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार नवी मुंबई परिसरात या वस्तूंची नक्कल करून, त्यांची विक्री करत असल्याची तक्रार नवी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर न्हावाशेवा पोलिसांनी याबाबत तपास करून, देवम रेसिडन्सी सेक्टर 17 उलवे येथे धाड टाकून, झडती घेतली असता, त्यांना हा बनावट माल आढळून आला.
यावेळी डेटॉल व्हीट हार्पिक लायझॉल आणि कोलीन सर्फ एक्सेल डेटॉल हॅन्ड वॉश यासारखे बनावट प्रॉडक्ट जप्त केले. या जप्त केलेल्या मालाची किंमत जवळजवळ सहा लाख रुपये आहे. या प्रकरणी राजेशभाई चामरिया व अरविंद पटेल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.