सावळा गावात कृत्रिम पाणीटंचाई

जलवाहिनीला भोके पाडून गळती सुरु

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील सावळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सावळा गावातील महिलांना थेंबभर पाण्यासाठी तासनतास बसून राहावे लागत आहे. येथील पिण्याच्या जलवाहिनीला अज्ञात व्यक्तींनी भोके पाडून ठेवले आहेत. त्यामुळे या गावातील लोकांना पिण्याचे पाणी घरापर्यंत नेण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहेत. सावळा गावातील महिलांच्या डोक्यावरील हांडे कधी खाली येणार, अशी विनवणी तेथील ग्रामस्थ बळीराम गोविंद दळवी यांनी केली आहे.

गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योजना ही पेज नदीवरून केली आहे. पेज नदीवरून हे पाणी गावात पोहचले आहे, मात्र काही ठिकाणी या नळपाणी योजनेच्या जलवाहिनी यांना भोके पाडून ठेवले आहेत. त्याचा परिणाम गावात पिण्याचे पाणी पोहचत नाही. त्यामुळे स्थानिक महिलांना गावाबाहेर असलेल्या खासगी बोअरवेलवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. तर गावातील काही महिला कोणत्याही खासगी बोरवेल असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा महिला या भोके पाडलेल्या जलवाहिनीच्या खाली तासन तास बसून हंड्यात पाणी भरण्याचा प्रयत्न करीत असतात.

Exit mobile version