। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा नवीन पोसरी येथील राहुल अनंत राऊत (27) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नवीन पोसरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल राऊत हा कित्येक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. मात्र, त्याला योग्य असा रोजगार न मिळाल्याने तो निराश होऊन जायचा.
त्याने नैराश्येतून घरात कोणीही नसताना घरातील लाकडी भालाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मुल्ला, तपासिक अंमलदार खाड्ये पुढील तपास करीत आहेत.