। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जालना शहरातील टाऊन हॉल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी आणि उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने साप्ताहिक हिरकणीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हिरकणी पुरस्काराने महाराष्ट्रातील दहा कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योजक शिवरतन मुदंडा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कैलाश सचदेव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष अॅड.अश्विनी धन्नावत, साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीच्या मुख्य संपादक करुणा अच्युत मोरे, कार्यकारी संपादक सातारा विद्या निकाळजे, कार्यकारी संपादक मुंबई व नवी मुंबई संगीता ढेरे, रोटरी क्लबचे ड महेश धन्नावत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
हिरकणी महोत्सव आणि हिरकणी पुरस्कार वितरण सोहळ्यात तपस्वी नंदकुमार गोंधळी रायगड, सलमान शेख हिंगोली पोलीस कॉन्स्टेबल, नालंदा लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक औरंगाबाद, रंजना सानप सातारा, शारदा लव्हाळे कोल्हापूर, सुमन तोरणे रायगड, कुसुम सोळंके जालना, शैला खाडे रायगड, सारिका शिरसागर लातूर, वैष्णवी सोळंके जालना यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टरसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच शिवशाहीर रामानंद उगले यांचा महिलांसाठीचा खास सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी पार पडला.