। चौक । वार्ताहर ।
कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघाच्या सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती अशोक जाणू मरागजे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगड, ठाणे व पालघर ह्या तीन जिल्ह्यांतील अंतर्भूत कोयना मराठा समाजाची ही संघटना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय व समाजाच्या उन्नतीसाठी, मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम करीत आहे. ही सामाजिक संघटना असुन, संघटनेची स्थापना 1971 साली झाली. या संघटनेची नुकतीच जाहीर परिषद पार पडली. त्यामधून नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असुन पांडुरंग कृष्णा साळुंखे शेमडी (खालापूर) यांची अध्यक्ष व अशोक जानू मरागजे यांची सचिवपदी एकमताने निवड झाली.