मोहोपाड्यात अष्टविनायक हॉस्पिटलचे उद्घाटन

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून, येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग गेला असून, परिसरात सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने अपघातात जखमी झालेल्यांना मुंबई येथे उपचारार्थ न्यावे लागते. यात अधिक वेळ जात असल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे.
परंतु, आता रसायनीकरांसाठी सुसज्ज असे पनवेल खांदा कॉलनी येथील अष्टविनायक हॉस्पिटल मोहोपाड्यातच झाले असून, या हॉस्पिटलचे उद्घाटन वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हॉस्पिटलचे डॉ. अक्षदीप अग्रवाल, डॉ. अन्सारी, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये डायलेसीस, आयसीयू, व्हेंटीलेटर, ऊस्पाईन, न्यूरॉलॉजी यांच्यासह विविध सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात येणार असून, रूग्णांसाठी सर्व प्रकारचे कॅशलेश इन्शुरन्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. रसायनीकरांसाठी माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने डॉ. अक्षदीप अग्रवाल यांचे आभार मानले जात आहेत.

Exit mobile version