आशियाई अजिंक्यपद चषक

भारतीय हॉकी संघाची घोषणा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा भारतीय पुरुष हॉकी संघ पुन्हा मैदानावर उतरणार आहे. आशियाई अजिंक्यपद चषकासाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी (दि.28) करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पुढील महिन्यात 8 ते 17 सप्टेंबर या कालावधीत चीनमधील इनर मंगोलियातील हुलुनबुईर येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. आगामी आशियाई अजिंक्यपद चषकासाठी 18 सदस्यीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे.

पॅरिसमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेन विरुद्ध 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली हॉकी संघाने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. गोलरक्षक श्रीजेश याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघातील ही पोकळी भरून काढण्याचे आव्हान युवा खेळाडूंवर आहे. त्याच्या जागी कृष्णा पाठक याला संधी देण्यात आली आहे. मुंबईचा सुरज करकेराला राखीव गोलरक्षक म्हणून संघात निवडले गेले आहे. यावेळी ऑलिम्पिकपदक विजेत्या संघातील दहा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंत सिंग या पाच खेळाडूंना या विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघ
गोलरक्षक- कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा. बचावपटू- जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमित. मिडफिल्डर- राज कुमार पाल, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, मोहम्मद सिंह, राहिल मौसीन. फॉरवर्ड- अभिषेक, सुखजीत सिंग, अराईजीत सिंग हुंदल, उत्तम सिंग, गुरज्योत सिंग.
वेळापत्रक:
8 सप्टेंबर- विरुद्ध चीन, 9 सप्टेंबर- विरुद्ध जपान, 11 सप्टेंबर- विरुद्ध मलेशिया, 12 सप्टेंबर- विरुद्ध दक्षिण कोरिया, 14 सप्टेंबर- विरुद्ध पाकिस्तान.
Exit mobile version