पार्किंगच्या वादातून मारहाण

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील आयजीपीएल कंपनीच्या प्रवेशव्दारावर रखवालदारांनी एका चालक व त्याच्या मदतनीसाला बेदम मारहाण करून चालकाच्या हाताचे हाड तोडल्याची तक्रार तळोजा पोलिसांनी नोंदविली आहे. अद्याप मारहाण करणारे रखवालदार नेमके कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. तळोजा पोलिसांना ट्रेलर चालक संजय खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयजीपीएल कंपनीच्या प्रवेशव्दार क्रमांक 2 जवळ ही घटना घडली. ट्रेलर चालक संजय व त्याच्या मदतनीसाला गाडी कंपनीच्या प्रवेशव्दारावर वाहन उभे केल्याने बेदम मारहाण केल्याचे संजय यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संजय याला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्यांच्या डाव्या हाताचे हाड तुटले आहे. तसेच पायाला सुद्धा लाकडी काठीने मारहाण केली.

Exit mobile version