जखमी झालेल्या तरुणाला मदत

। नेरळ। प्रतिनिधी।
कर्जत – मुरबाड रस्त्यावर झालेल्या अपघातात ओमकार अशोक पवार रा. टोकावडे हा गंभीर जखमी झाला. लग्नाच्या पत्रिका वाटायला जात असताना हा अपघात झाला होता. मात्र आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्या तरुणावर योग्य उपचार होत नव्हते आणि त्यामुळे स्थानिक आदिवासी परिसरातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी आर्थिक मदत दिली असून त्या तरुणाच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिक्षक रवी काजळे हे शाळेतून येत असताना रात्री सात च्या सुमारास एका दुचाकीवरून येणार्‍या वाहनाने दुचाकीवरील युवकास जोरात धडक दिली आणि तो त्याला तिथेच सोडून पसार झाला होता आणि समोरील युवकाच्या जबड्याला जबर मार लागला होता.गुरुजींनी तातडीने त्या युवकास मुरबाड येथे नेल. परंतु मार जास्त असल्याने त्याला कल्याण येथे नेण्यास सांगितले, तोपर्यंत त्याच्या घरच्यांना संपर्क साधून त्याला कल्याण मधील स्माईल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले, त्याच्या जबड्याचे ऑपरेशन करणे आवश्यक होते.परंतु त्यासाठी लागणारा खर्च जास्त होता हे समजताच रवी काजळे यांनी स्वतः काही रक्कम दिली व शिरोडकरच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मदतीसाठी आवाहन केले त्याला प्रतिसाद देत माजी विद्यार्थ्यांनी 10 हजार रुपये जमा केले.त्यामुळे त्याच्यावर यशस्वी उपचार झाले आणि त्याचे प्राण वाचले आहेत.दोन महिन्यानंतर सदर युवकास बोलता येणार आहे.

Exit mobile version