बोर्लीपंचतनला शेकापचे आस्वाद पाटील यांची भेट

। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
खा.सुनील तटकरे हे श्रीवर्धन तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटन व भुमीपुजनाच्या दौर्‍यावर होते. तर दुसरीकडे शेकापचे जिप सदस्य आस्वाद पाटील याच्या आगमनाने राजकीय समीकरणे बदलल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी बोर्लीपंचतन येथे शेकापचे नेते विलास तोडणकर यांचे निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. यावेळी मनोहर कांबळे, अमित पाटील, लीलाधर खोत, आनसार चांगले, विकास तोडणकर यांच्या हस्ते आस्वाद पाटील स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते महमद भाई मेमन, शेकाप कार्यकर्ते स्वप्नील बिर्‍हाडी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version